Ganeshotsav 2021| सांगरुळमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा गणेश उत्सव | Sangrul | Sakal Media |
कोल्हापूर (kolhapur): सांगरुळ ता. करवीर येथे जाती भेदाच्या पलीकडे जाऊन एका तरुण मंडळाने जिल्ह्यासह राज्याला आदर्श ठरेल असा गणेश उत्सव साजरा केला आहे. हिंदू मुस्लिम आणि अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून गणेशोत्सव साजरा केला. या बिरोबा गणेश मंडळाने ३५ वर्षांची परंपरा कायम राखली आहे. मुस्लिम बांधवाने यंदा गणपतीची मूर्ती दिली असून आज सर्व जाती-धर्माच्या कुटुंबानी एकमेकांना पेहराव दिला आहे. महिलांनी गारवा आणून गोडधोड प्रसादाचे वाटप केले. यामुळे एकीचे दर्शन झाले आहे. (बातमीदार : कुंडलिक पाटील,सांगरुळ ) (व्हिडिओ- बी.डी.चेचर)
#Ganeshotsav2021 #kolhapur #GaneshFestival #sangrul